हॉलस्टॅट (Hallstatt) यूरोपमधील सर्वात सुंदर गावांपैकी एक !
हॉलस्टॅट (Hallstatt) हे युरोपमधील छायाचित्रित गाव म्हणून ओळखले जाते. हॉलस्टॅटचे युनेस्कोचे जागतिक सुंदर दृश्य संपूर्ण युरोप आणि जगभरातील प्रवाशांना आकर्षित करते. त्याची १६व्या शतकातील सुंदर रेखीव घरे, गल्लीतले कॅफे आणि दुकाने आहेत. हॉलस्टॅट (Hallstatt) मधील भूगर्भातील मीठ सरोवर असलेली प्राचीन मिठाची खाण , हिमनदीचे खड्डे , स्कायवॉक आणि धबधबा ह्या गावाला आजून सुंदर बनवते.
हॉलस्टॅट मधील एका दिवसाचा प्रवास
हॉलस्टॅट चा माझा हा दुसरा प्रवास, अमृताचा पहिला.
चारी बाजूने डोगराने वेढलेले हे फोटोजनिक गाव जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते आणि त्यातले आम्ही एक.
आम्ही आमचा प्रवास ग्राझ (GRAZ) ह्या गावातून सुरु केला, मी माझ्या ऑफिसचा कामा निमित्याने ग्राझ (GRAZ ) ला गेलो होतो आणि ग्राझ (GRAZ) पासून हॉलस्टॅट फारशे काही लांब नाही.
हॉलस्टॅट ला फिरायला तुम्हाला खूप सारे पर्याय उपलब्ध आहे, ग्राझ आणि सॉल्ज़बर्ग (Salzburg) पासून.
हॉलस्टॅट (Hallstatt) हे एक छोटेसे गाव आहे जे एका दिवसात सहज पाहता येते. आमच्यासाठी एका दिवसाची ट्रिप परफेक्ट होती.
उन्हाळ्यात यूरोपमधील दिवस हे खूप मोठे असतात. साधारणपणे जून महिन्यात सूर्यप्रकाश हा सकाळी ५ वाजल्या पासून ते रात्रीचे ८ – ९ वाजे पर्यंत असतो. आम्ही जून मध्ये प्रवास करत असल्या कारणाने आम्हाला त्याचा खूप मोठा फायदा झाला. पर्यटकांनी ह्या गोष्टीचा पण विचार करायला पाहिजे यूरोपमधील ट्रिप प्लॅन करताना.
ऑस्ट्रियाचा ट्रेन प्रवास एक वेशष आणि बघण्यासाखा आहे, कारण ऑस्ट्रिया मधील ट्रेन खूपच मनमोहक आहे. तुम्ही एकदा तरी ट्रेन चा प्रवास आवर्जून करावा.
आम्ही ग्राझ (GRAZ) ते हॉलस्टॅट (Hallstatt) हा ट्रेननी प्रवासाचा प्लॅन केला होता. ग्राझ पासून हॉलस्टॅटला जायला किमान तरी २.३५ तास लागतात. आम्ही ग्राझ पासून सकाळची ७:४५ ची ट्रेन पकडली . डायरेक्ट ट्रेन नसल्या कारणाने आम्ही मध्ये Stainach-Irdning Bahnhof या स्टेशनला एकदा ट्रेन चेंज केली.
ट्रेनच्या प्रवासामधून दिसणारी दृश्ये मनाला भिडणारी होती. आजूबाजूच्या पर्वत रांगा, मोकळी हिरवीगार शेतं, आणि मनमोहक गावं.
ऑस्ट्रिया मधील रेल्वे वाहतुकीसाठी OBB या वेबसाइटद्वारे तिकीट बुक केले जाऊ शकतात. तिकीट मशीन काउंटरवर क्रेडिट कार्ड वापरून स्टेशनवर तिकीट बुक करणे पण शक्य आहे.
तुम्हाला तुमच्या प्रवासाविषयी खात्री असल्यास मी तुम्हाला ऍडव्हान्स बुकिंग करण्याचा सल्ला देईंन. आम्ही सुद्धा आमच्या ट्रेन ची तिकीट ३ ते ४ आठवड्या आधीच बुक केले होते.
आम्ही सुमारे सकाळी १०:२० ला हॉलस्टॅट स्टेशन ला पोहोचलो. हॉलस्टॅट रेल्वे स्टेशन हे हॉलस्टॅट तलावाच्या पलीकडे आहे. हॉलस्टॅट स्टेशनवर चक्क काहीच नाही, एका छोट्याशा वेटिंग रूम शिवाय.
हॉलस्टॅट (Hallstatt) स्टेशनला फक्त एकच प्लॅटफॉर्म असून दोन्ही दिशांनी येणाऱ्या गाड्या या एकाच प्लॅटफॉर्म वर थांबतात.
हॉलस्टॅट स्टेशन पासून १०-१५ मिनिटांची फेरी तुम्हाला हॉलस्टॅट गावामध्ये सोडवते, त्याचे रिटन तिकीट प्रति व्यक्ती १४ युरो आहे.
Hallstatt मीठ खाण केबलकार
बोट फेरीतुन उतरल्या नंतर दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर तुम्ही केबल कारने हॉलस्टॅट मीठ खाणींकडे जाऊ शकता (जर्मनमध्ये साल्झवेल्टन म्हणून ओळखले जाते).
केबल कारचे रिटर्न तिकीट हे २० युरो आहे.
स्कायवॉक हॉलस्टॅट
तुम्हाला हॉलस्टॅट गावाचे उंचावरून दृश्य बघायचे असेल तर केबल कार हा एकमेव पर्याय आहे. कॅबलकारने वर गेल्यावर हॉलस्टॅटच्या छतापासून 360m (1,181ft) असलेला वॉकवे वरून बाहेर पडून हॉलस्टॅट सरोवर आणि आजूबाजूच्या शिखरांवरील विलोभनीय दृश्ये दिसतात.
आम्ही या निसर्ग सौंदर्यचा खूप आनंद लुटला आणि खूप सारे फोटो काढले.
हॉलस्टॅट ची प्रत्येक जागा ही फोटो काढण्या सारखी आहे.
रुडॉल्फस्टर्म हे एक, पूर्वीचे संरक्षण टॉवर जे थेट उंचावर आहे, ते आता एक रेस्टॉरंट आहे. तिथे तुम्हाला स्थानिक स्वादिष्ट स्नित्झेल आणि पालक डंपलिंग्स चे जेवण करता करता तिथल्या मनमोहक दृश्याचा पण आनंद घेऊ शकता.
मार्केट स्क्वेअर
हॉलस्टॅट शहराच्या मध्यभागी स्थित, मार्केट स्क्वेअर आहे , भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखले जाते.
लोकल दुकानांमध्ये शॉपिंग करत आणि आइस्क्रिम चा आस्वाद घेत आम्ही संपूर्ण हॉलस्टॅट पालथे घातले.
संद्याकाळची ४:४५ चे फेरी घेऊन आम्ही आमची परत ग्राझला जाणारी ट्रेन पकडली.
हॉलस्टॅटला भेट देण्यापूर्वी जाणून घ्यायच्या गोष्टी
प्रत्यक पर्यटक गटांमध्ये हॉलस्टॅट अत्यंत लोकप्रिय आहे. मला खात्री आहे की कोणत्याही वेळी, शहराभोवती फिरताना तुम्हाला खूप सारे प्रवासी बसमधून आलेले आढळून येतील. चिनी पर्यटकांची संख्या जास्त असल्या कारणाने काही रेस्टॉरंट्समध्ये चायनीज मेनू मिळणे पण सहज शक्य आहे.
तुम्हाला गर्दी टाळायची असल्यास, ऑफ सीझनमध्ये भेट द्या, लवकर उठा किंवा मुक्काम करा.
हॉलस्टॅटला भेट देण्यासाठी २४ तास पुरेसे आहेत. जरी शहर लहान असले तरीही, शहराचा शोध घेण्यासाठी दुपारपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे खाली शहरात चालत जाण्यासाठी आणि मिठाच्या खाणींपर्यंत जाण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ असल्याची खात्री करा.
कारने हॉलस्टॅटला जाणे सर्वात सोपे आहे. विशेषत: तुम्हाला टूर ग्रुपपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, कारने भेट देणे तुम्हाला पर्यटकांचा प्रवाह कमी असताना येण्या-जाण्याची लवचिकता देते. शहरात पार्किंगला परवानगी नाही, परंतु तुम्ही शहराबाहेरील गॅरेजमध्ये पार्क करू शकता आणि विनामूल्य शटल मिळवू शकता (किंवा फक्त चालत जा, यास फक्त १० मिनिटे लागतात). तसेच तुम्ही कार वापरत असल्यास, सार्वजनिक परिवहनाने सहज प्रवेश करण्यायोग्य नसलेल्या प्रदेशातील इतर शहरांमध्ये जाणे खूप सोपे करते.
तुम्ही ट्रेन आणि फेरीने हॉलस्टॅटला देखील पोहोचू शकता. कार भाड्याने घेणे तुमच्यासाठी पर्याय नसल्यास, तुम्ही साल्झबर्ग येथून ट्रेन आणि नंतर रेल्वे स्टेशनपासून शहरापर्यंत फेरी देखील घेऊ शकता. येथे एक फायदा असा आहे की तुम्हाला तुमची कार कुठे पार्क करायची, हे शोधण्याची गरज नाही.
Leave a reply