नवीन हायकर्ससाठी टिप्स आणि युक्त्या
नवीन हायकिंग करणाऱ्याच्या डोक्यामध्ये बरेसचे प्रश्ने असतात.
ह्या ब्लॉग द्वारे, आम्ही त्या पडलेल्या प्रश्नांची उत्तरे सहजरित्या देण्याचा प्रयत्न केला आहे.
“धाडसी व्हा पण निष्काळजी नको.”
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हायकिंग करणाऱ्यानी धाडसी असावे पण निष्काळजी नसावे.
आपण काय, कुठे आणि कसे चाललो ह्याची पूर्णपणे माहिती करून घ्यावी. प्रत्येक गोष्टीची माहिती ही तुमच्या घरच्या सोबत शेअर करावी. तुम्ही घेऊन जाणाऱ्या प्रत्यक वस्तूचा उपयोग कसा आणि कधी करायचा, याची तुम्हाला पूर्णपणे माहिती असली पाहिजे.
दुसरी गोष्ट म्हणजे “हायकिंग हा खेळ नाही.”
त्यामुळे आज ठरवले आणि उद्या हायकिंग करायला गेलो असे होत नाही, त्याची काळजी घ्या.
सराव माणसाला परिपूर्ण बनवतो, त्यामुळे हायकिंग च्या काही महिने आधी सरावाला सुरवात करा.
असे करत करताना तुम्हाला हळूहळू लक्षात येईल कि तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे लक्ष केंद्रीक करायचे आहे.
आपण आपल्या प्रकुर्तीची काळजी घेतली पाहिजे, जे ने करून हायकिंग करताना तुम्हाला त्याचा त्रास न होता, निसर्गाचा आंनद अनुभवता आला पाहिजे.
तुमच्या पहिल्या हायकिंग ट्रिपसाठी काय पॅक करावे
हायकिंगसाठी काय पॅकिंग करतोय हे खूप महत्वाचे आहे.
तुम्ही जितके हलकी बॅगपॅक कराल तितके चांगले. तथापि, जर तुम्ही दिवसभर हायकिंगची योजना आखत असाल तर तुम्हाला बऱ्याचशा वस्तूंची आवश्यकता लागेल.
हायकिंग चा मार्गदर्शक म्हणून, मी येथे हायकिंगसाठी लागणारी यादी तयार केली आहे.
- नेव्हिगेशन साधने
- पुरेसे पाणी
- पुरेसे अन्न
- कपडे आणि पावसापासून संरक्षण
- सुरक्षेच्या बाबी
- प्रथमोपचार किट
- बहुउद्देशीय साधन किंवा चाकू
- सूर्य संरक्षण
- बॅकपॅक
- कचऱ्याची पिशवी
- बग स्प्रे
- प्रसाधनसामग्री
Leave a reply