नॉर्वेचे जादुई बेट लोफोटेन (Lofoten).
लोफोटेन हे सगळी कडे उंच अश्या पर्वतांनी भरलेले, निर्जन किनारे, मनमोहक लाल रंगाची घरे आणि हिरवागार डोळे दिपवणारा अतिशय सुंदर निसर्ग असलेले हे बेट.
लोफोटेन बेटे ही युरोपमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे, यात काही शंकाच नाही. विशेतः उन्हाळ्यात (मे पासून ते जुलै पर्यंत) लोफोटेन येथे तुम्ही २४ तास सूर्यप्रकाशाचा अनुभवू घेऊ शकता. तसेच हिवाळ्यात लोफोटेनमध्ये रात्र सर्वात लांब असतात. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा नॉर्दर्न लाइट्स पाहण्यासाठी परिपूर्ण पीक सीझन आहे. ह्या गोष्टी लोफोटेन च्या सौंदर्यात आजून भर घालतात. त्यामुळे लोफोटेनला परिपूर्ण बेट असे मानण्यात काही हरकत नाही.
हे हायकिंग चे नंदनवन आहे, कारण या ठिकाणी तुम्हाला खूप सारे हायकिंग चे क्षेत्र दिसून येतील. लोफोटेन नॅशनल पार्कमधील रायटेन (Ryten) हे एक सर्वात लोकप्रिय हायकिंग क्षेत्र आहे. त्याचे एक कारण म्हणझे ‘फ्रोझन’ (Frozen) या चित्रपटाचे चित्रीकरण इथंच झाले आहे. खरोखरच तुम्ही रायटेन-लोफोटेनची एक फेरी तुमच्या विश लिस्ट मध्ये समाविष्ट केली पाहिजे. रायटेनच्या माथ्यापासून लांब सोनेरी समुद्रकिनाऱ्यापर्यंतचे दिसणारे सुंदर दृश्य मनाला भिडणारे आहे.
नॉर्वे मधील आमच्या सर्वोत्तम हायकिंगपैकी रायटेन (Ryten) ही एक आहे.
रायटेन-लोफोटेन हायकिंगचा तपशील
• एकूण हायकिंग वेळ तुम्ही ३.५ ते ५.५ तास अपेक्षित करू शकता.
• डोगराची उंची वाढ एक प्रभावी ६८० मीटर आहे.
• रायटेन लोफोटेनचे अंतर एकूण ८.७ किलोमीटर आहे.
• नॉर्वेजियन टुरिस्ट असोसिएशनने स्कोअर केल्यानुसार अडचण रेटिंगची डिग्री ‘मध्यम’ किंवा ‘ब्लू’ ग्रेडिंग आहे याचा अर्थ मूलभूत फिटनेस आणि कौशल्ये असलेले कोणीही या वाढीचा प्रयत्न करू शकतात.
• सर्वोत्तम रायटेन लोफोटेन हायकिंग मे ते सप्टेंबर दरम्यान आहे. थंडीच्या महिन्यांत खूपच बर्फ असतो ज्यामुळे हायकिंग करणे आव्हानात्मक आहे कृपया ते टाळा .
• या हायकिंगमध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल – बीच, पर्वत शिखरे, खाडी, बेट, खडकाळ बाहेरील दृश्ये. तुमच्या डोळयासमोर चित्र तयार होण्यासाठी, आमचे काही फोटो मी या ब्लॉग मध्ये शेअर केले आहे, ते बघून तुम्हाला कल्पना येईलच.
रायटेन हायकिंग, लोफोटेन
रायटेन हा उत्तर नॉर्वेमधील मोस्केन्सोया (Moskensoya), लोफोटेन बेटाच्या उत्तरेकडील भागावर असलेला एक पर्वत आहे.
आम्ही रायटेन हा पर्वत चढायला फ्रेडवांग (Fredvang) या छोट्याशा गावात राहत असलेल्या हॉटेल पासून सकाळी ७ वाजता सुरवात केली.
सकाळचे वातावरणात बरयापैकी थंड होते. आमचा हा एका दिवसाचाच हायकिंग चा प्लॅन होता, पण अतिउंच ठिकाणी हवामान अनपेक्षित असल्या कारणाने आम्ही रात्री राहायची पुरेपूर तयारी करूनच निघालो होतो . त्यानुसार माझ्या बॅकपॅक मध्ये २० किलो पेक्षा जास्त सामानाचे ओझे होते, मग त्यात डोंगरावर राहण्यासाठी असलेला मोठा टेन्ट, अतिरिक्त कपडे, स्लीपिंग बॅग, जेवणाचे सामान, पुरेसे पाणी, एवढाच काय तर एक छोटीशी गॅस ची शेगडी सुद्धा बरोबर घेतली होती आणि बरेच काही सामान. अमृता कडच्या बॅकपॅक मध्ये सुद्धा १० -१२ किलो सामान होते. वेद कडे आम्ही फक्त ड्रोन ची बॅग दिली होती.
हॉटेल पासून आम्ही सुमारे १ किलोमीटर पश्चिमेकडे चालत गेल्यावर आम्ही ‘स्ट्रॅन्डवीन’ नावाच्या रस्त्यावर पोहचलो. येथे रस्त्याच्या सुरवातीलाच रायटेनला जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे.
रायटेन कडे जाणाऱ्या पायथ्या जवळच पार्किंग आहे. एका दिवसाच्या पार्किंगसाठी १००Kr (अंदाजे 10 Euro) असा खर्च येतो.
पार्किंगची जागा सोडून पुढे गेल्यावर, रायटेन चढण्याची अधिकृत पायवाटेची सुरुवात पश्चिमेकडे रस्त्याच्या खाली सुमारे १०० मीटर च्या देशाने आहे.
सुरुवातीचा पायवाटेचा भाग थोडा साधा व सोपा आहे, पण हळू हळू चढण चालू झाल्यावर तो कठीण होऊ लागतो. पाऊलवाट ही अरुंद होऊ लागते.
त्यानुसार आम्ही एकमेकाना आधार देत पुढे जात राहिलो. आतिशय असे थंड असे वातावरण असल्या कारणाने, सहजरित्या आम्ही बऱ्याच उंचीवर पोहचलो.
मार्गमध्ये ठिकठिकाणी खड्डे, चिखल आणि छोटे छोटे पाण्याचे झरे आहेत, त्यामुळे गुलाबी रंगाच्या लाकडी फळ्या टाकलेल्या आहेत. पाऊलवाट चुकू नये म्हणून हायकर्स साठी थोड्या थोड्या अंतरावर दगडांवर मार्किंग करून ठेवले आहे.
जेव्हा आम्ही डोंगरांचा पहिल्या ओळीच्या माथ्यावर पोहोचलो, खूप सुंदर असा सपाट भाग बघण्यास मिळाला. मनमोहक असे दुहेरी तलावाचे दृश्य बघून आमचा सगळा थकवा दूर झाला. या तलावाचे नाव Einangsvatnet आहे.
येथून, पुढचे चढण आजून कठीण होत जाते. खडकाळ भाग चालू होतो, खडकाळ भागामध्ये लोखंडी चेन ठोकलेल्या आहेत, त्याच्या साहाय्याने चढण्यास थोडे सोपे होऊन जाते.
आम्ही काहीवेळात शिखरावर पोहचलो.
शिखरावर चे मनमोहक, अप्रतिम असे दृश्य जे शब्दात व्यक्त करणे खूपच कठीण आहे.
शिखरावर सुसाट्याचा वारा असल्यामुळे आम्ही थोडे खाली उतरून तलावचा काठी टेन्ट लावला. येथे तुम्हाला काही टेन्ट आजू बाजूला बघायला मिळतील. तंबू घेऊन जाणारे बहुतेक लोक टॉर्सफजॉर्डन पार्किंगपासून सुरू होतात आणि क्वाल्विका बीचवर जातात आणि नंतर ते एकतर रायटेनला जातात किंवा टॉर्सफजॉर्डनला परत जातात.
हवामान चागले असल्या कारणाने आम्हाला संध्याकाळ पर्यंत रायटेन शिखराचा पूर्णपणे आनंद घेता आला.
संध्याकाळी ६ चा सुमारास बॅगपॅक भरून पुन्हा हॉटेल कडे रवाना झालो.
वर चढण्यापेक्षा खाली उतरतानाचा प्रवास थोडा कठीण आहे. विशेषत: उतरणीचा पहिला भाग, जो अतिशय उंच आणि चिखलाने माखलेला असलेल्या कारणाने खूपच निसरडा आहे.
खाली उतरताना फोटो काढण्याचा पुरेपूर फायदा घेत आम्ही आमच्या हॉटेल मध्ये रात्री ८ वाजे पर्यांत पोहचलो. पण नॉर्वे मध्ये जून महिन्या मध्ये २४ तास सूर्य असल्याकारणाने रात्रीचे ८ वास्ता पण दुपारचे १२ वाजल्या सारखे वाटत होते.
रायटेन, लोफोटेन जवळ राहण्याची सोय
यट्रेसँड बीच (Ytresand Beach) पासून 1.५ किमी अंतरावर आणि कोल्बेन्सँडेन बीच (Kolbeinsanden Beach), पासून 1.७ किमी अंतरावर फ्रेडवांग (Fredvang), येथे असलेल्या लिडरसन रॉर्ब्युअरमध्ये (Lydersen Rorbuer) आम्ही थांबलो होतो.
Leave a reply